अभिनंदन पत्र लेखन मराठी | Abhinandan Patra Lekhan In Marathi | Congratulation Letter in the Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हाला अभिनंदन पत्र Congratulation Letter in the Marathi लिहायचे आहे तुमच्या मित्राला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर तुम्हाला अभिनंदन पत्र लिहायचे असेल तर हे कसे लिहायचे मी तुम्हाला या लेखांमध्ये मराठी भाषेमध्ये सांगितलेले आहे.

अभिनंदन पत्र लेखन Abhinandan Patra Lekhan In Marathi हे एक अनौपचारिक  पत्रलेखन आहे म्हणजे या पत्रलेखन मध्ये तुम्हाला फक्त अभिनंदन करणारे वाक्य लिहायचे असतात हे सर्व मी तुम्हाला खाली लिहून दिलेले आहेत आणि त्यांचे नमुने वाचून तुम्ही तुमचे पत्र लिहू शकता .

खाली तुम्हाला काही पत्र लेखनाचे औपचारिक आणि अनौपचारिक नमुने दिलेले आहेत हे नमुने वाचून तुम्ही तुमच्या अनुसार शालेय वापरासाठी पत्रलेखन करू शकता किंवा तुम्ही हेच नमुने शालेय वापरासाठी वापरू शकता

Abhinandan Patra Lekhan In Marathi

अभिनंदन पत्र लेखन मराठी Congratulation Letter in the Marathi

दिनांक 22/8/2021

प्रति,

शुभम पाटील,

जवाहर विद्यालय, शिरूर,

पुणे, महाराष्ट्र

प्रिय मित्र,

मला खूप आनंद होत आहे हे कळल्यावर की तुला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे मी आजच सकाळी माझ्या मोबाईल वरती आलेला तुझा प्रविण्या चा फोटो बघितला सर्वात आधी तुझे खूप खूप अभिनंदन कारण तू आपल्या जिल्ह्याला नव्हे तर राजाला खूप मोठा विजय मिळवून दिला आहे.

आपल्या राज्याचे नाव संपूर्ण भारतभर गाजवले आहे.माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तू अशीच आपल्या राज्याला सुवर्णपदक आणून दिले तसेच एक दिवशी आपल्या भारत देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देतील सर्व परिश्रमाचे श्रेय तुझे आहे आणि तू किती जास्त मेहनत करत होतास हे मला खूप चांगले माहित आहे.

  तुझ्या या यशामुळे आपल्या गावातील सर्व खेळाडूंचे मनोबल खूप जास्त वाढले आहे आणि याच बरोबर गावातील सर्व लोकांना खेळाचे महत्त्व समजले आहे यामुळे आपल्या या गावातील खूप जास्त खेळाडूंना घरूनही प्रोत्साहन मिळणार आहे. गावातील खूप सार्‍या खेळाडूंचे तू प्रेरणास्थान झाला आहे.

तू आपल्या गावी आल्यानंतर तुझा आपल्या गावात खूप मोठा सत्कार होणार आहे आहे त्यामुळे मी खूप जास्त आनंदी झालो आहे लवकर तुझी स्पर्धा पूर्ण करून तू आपल्या गावी ये आणि अशीच खूप जास्त प्रगती करत रहा तुझ्या पुढील वाटचाली आणि स्पर्धेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.

लवकर कळावे,

 तुझा प्रिय मित्र,

साहिल गायकवाड

1 to 100 marathi words

तुमच्या मित्राचा शालेय वकृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आला आहे त्या मित्राला अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहा-Abhinandan Patra Lekhan In Marathi

दिनांक 12/9/2021

प्रति,

राज जाधव,

श्री शिवाजी महाविद्यालय ,

अमरावती महाराष्ट्र,

प्रिय मित्र,

आज सकाळी जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा मला असे कळले की तुझा आपल्या शाळेमध्ये जो वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम झाला होता त्यामध्ये तू खूप मोठ्या उत्साहाने आणि तयारीने भाग घेतला होता त्याचा निकाल मिळाला तुझे खूप खूप अभिनंदन कारण तू आपल्या शाळेमध्ये वकृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आहे.

मला खूप अभिमान वाटत आहे की माझ्या मित्राने या स्पर्धेमध्ये पहिले पारितोषक घेतले आहे तुला वकृत्व स्पर्धेची अगोदरपासूनच खूप जास्त आवड होती आणि तुझ्या याच कठीण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हा तू टप्पा पार केलेला आहेस तुझाया कौतुकास्पद कामगिरीची बातमी मी माझ्या सर्व मित्रांना दिली आहे.

त्या सर्व माझ्या मित्रांनी तुझे खूप जास्त कौतुक केले तू अशीच भविष्यातील खूप मोठ्या वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक घेऊन यावा अशी माझी इच्छा आहे तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

लवकर कळावे,

 तुझा प्रिय मित्र,

शुभम पाटील

वृक्षारोपण केल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लेखन Abhinandan Patra Lekhan In Marathi

दिनांक 22 ऑगस्ट 2021

प्रति, 

व्यवस्थापन हरित समृद्धी ट्रस्ट, 

मुळशी,पुणे

विषय – वृक्षारोपण बाबत अभिनंदन करण्याबाबत.

महोदय,

सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे. पर्यावरण असंतुलित आहे या सर्वांचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे

या पार्श्वभूमीवर आपली हिरवाई ट्रस्ट “झाडे लावा झाडे जगवा” हे आपले ब्रीदवाक्य प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहीत करत आहे. 

आपल्या मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे आपल्या परिसरात लावत आहेत.आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले मन पूर्वक अभिनंदन

आपली विश्वास,

विद्यार्थी प्रतिनिधी

अ ब क

श्री शिवाजी विद्यालय अमरावती

अनौपचारिक पत्र – दहावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये प्राविण्य मिळाल्याबाबत अभिनंदन पत्र अभिनंदन पत्र लेखन मराठी

प्रिय सिद्धेश, 

स. न. वि.वि.

सिद्धी तुझे मनापासून अभिनंदन कारण तू खूप मोठी अशी कौतुकास्पद कामगिरी केली आहे यामुळे माझा तो मित्र असल्याचा मला खूप जास्त अभिमान आहे तुझ्या या यशाची बातमी ऐकल्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला आहे आपल्या शाळेतील नोटीस बोर्डवर मी तुझं मोठ्या एक अक्षरात लिहिलेलं नाव वाचलं त्या नावापुढे तुझ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुणांचा उल्लेख होता.

ते लिहिले होते आपल्या शाळेतील प्रथम क्रमांक हे वाचल्यानंतर मला मनातून खूप जास्त उत्साह आणि आनंद निर्माण झाला होता तू पहिला क्रमांक मिळवला याची बातमी आपल्या सर्व मित्रांना सांगितली आणि त्याचबरोबर आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना देखील मी ही बातमी जाऊन सांगितली माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी तुझी खूप जास्त प्रशंसा केली आणि याच बरोबर तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप जास्त शुभेच्छा.

त्यांनी दिल्या आपल्या गावात तुझ्या नावाच्या खूप जास्त चर्चा रंगल्या आहेत सर्वांच्या तोंडी तुझेच यशोगाथा आहेत मी तुझा खूप जवळचा मित्र असल्याकारणाने मला माहित आहे की तू किती जास्त मेहनत घेतली आहेस या सर्व यशासाठी आणि हे नक्कीच तुझ्या या सर्व मेहनतीचे फळ आहे मी देवाकडे हीच प्रार्थना करीन की तो अशीच आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती करत राहशील आणि आपल्या शाळेचे नाव मोठं करशील.

  कळावे तुझा प्रिय मित्र,

 राजेश 

 निष्कर्ष ; या पोस्टमध्ये मी तुम्हाला अभिनंदन पत्र लेखन Congratulation Letter in the Marathi विषयी काही नमुने दिलेली आहेत हे Abhinandan Patra Lekhan In Marathi नमुने तुम्ही तुमच्या शालेय वापरासाठी अगदी आरामात वापरू शकता आणि याच बरोबर हे सर्व नमुने हे मी माझ्या अनुभवाने दिलेले आहेत.

यामध्ये जर तुम्हाला काही चुकीचे वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला हे पत्र लेखन आवडलं असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता आणि जर अशाच प्रकारचे पत्र पत्रलेखन विविध निबंध विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर आणखीन देखील पोस्ट वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *