बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi 10th class with examples

तुम्हाला तुमच्या शालेय अभ्यासासाठी बातमी लेखन करायचे आहे तर तुम्हाला आजच्या या लेखामध्ये मी batmi lekhan in marathi या विषयी संपूर्ण माहिती ती खूप सोप्या भाषेत सांगितली आहे या लेखामध्ये तुम्हाला बातमी लेखन कसे करावे.

बातमी लेखनाचे काही उदाहरणे तुम्हाला मी दिलेले आहेत जर तुम्ही इयत्ता दहावी मध्ये असाल तर तुम्हाला बातमी लेखनाचे खूप सारे नमुने मी तुम्हाला दिलेले आहेत.

कारण batmi lekhan in marathi 10th class बातमी लेखन हे उपयोजित लेखन मधला खूप महत्त्वाचा भाग असतो आणि हे तुम्ही तुमच्या इयत्ता दहावीचा अभ्यासक्रमानुसार पेपर मध्ये लिहू शकता.

batmi lekhan in marathi

बातमी लेखन म्हणजे काय?- batmi lekhan in marathi meaning how to write batmi lekhan in marathi

आपल्या रोजच्या जीवनात ज्या आपल्या आजूबाजूला घडामोडी होत राहतात त्या सर्व घडामोडी आज-काल डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतात आणि याच बरोबर त्या सर्व घडामोडी तुम्हाला वर्तमानपत्र या गोष्टींमधून मिळतात.

याच वर्तमानपत्रांमध्ये ज्या सर्व घडामोडी लिहिण्याचे स्वरूप असते सर्व देशात जगात कोण कोणत्या घडामोडी चालू आहेत हे सर्व एका स्वरूपामध्ये लिहिले जाते याची बातमी असे म्हणले जाते बातमीचा मुख्य उद्देश लोकांना माहिती तसेच वर्तमान स्थिती ची सर्व माहिती देणे.

आपल्या सभोवताल कोणत्या गोष्टी घडत आहेत याबाबत समाजाला प्रबोधन करणे यास बातमी लेखन असे म्हणतात ही बातमी लेखन तुम्ही वृत्तपत्रांमध्ये बघू शकता आणि या डिजिटल युगात तुमच्या मोबाईल मध्ये ईपेपर या साधनांमधून बघु शकता.

बातमी लेखनाचे स्वरूप- batmi lekhan format in marathi

 1. बातमीचे शीर्षक (HEADLINE) -बातमी लेखन यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला बातमीतीचा मथळा लिहावा लागतो मथळा म्हणजे त्या बातमीची सर्वात आकर्षक अशी की त्या ओळी मध्ये बातमी कशासंबंधी आहे हे कळावे आणि यालाच हेडलाईन असे म्हटले जाते.
 1. बातमी स्त्रोत (NEWS SOURCE) – बातमी स्त्रोत मध्ये तुम्हाला ही बातमी कोणत्या पत्रकाराने दिली किंवा बातमीचा स्त्रोत कोणता आहे हे लिहावे लागते.
 1. स्थळ दिनांक (DATE AND TIME) – बातमी लेखन मध्ये तुम्हाला ती बातमी कोणत्या वेळी घडले आहे आणि ती कुठे गळून गेली आहे हे स्पष्ट करण्यासाठी तुमच्या बातमी मध्ये स्थळ आणि दिनांक या दोन गोष्टीचा उल्लेख असणे गरजेचे 

असते.

 1. मुख्य बातमी (MAIN NEWS) – जी बातमी तुम्ही लिहीत आहात ती बातमी कशासंबंधी आहे हे सर्व तुम्हाला मुख्य बातमीमध्ये लिहावे लागते आणि ती संपूर्ण स्वरूपामध्ये तुम्हाला लिहावे लागते यालाच बातमीचा शिरोभाग असे म्हटले जाते यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा भाग बातमीचा लिहावा लागतो.
 1. बातमीचा तपशील (NEWS DETAILS) – बातमी लेखन मध्ये सर्वात शेवट म्हणजे तुम्हाला बातमीचा सर्व तपशील लिहावा लागतो यामध्ये तुम्हाला बातमी मध्ये कोणत्या ठिकाणी काय घडले आणि बातमी कोणत्या विषया संबंधी आहे हे लिहावे लागते.

बातमी लेखन कसे करावे ?- how to write batmi lekhan in marathi-

बातमी लेखन करताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ही पण तुम्हाला मी आज सांगणार आहे यामुळे तुम्हाला बातमी लेखन विषयी असलेले सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.

बातमी लेखन करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात हे तुम्हाला खाली दिलेली आहे

 • बातमी लेखन करताना भाषा साधी आणि सरळ असावी

बातमी लेखन करताना जी आप भाषा आपण बातमी लेखनासाठी वापरत आहे ती भाषा साधी सोपी सरळ असली पाहिजे आणि याच बरोबर बातमी लेखनामध्ये जास्त अवघड भाषा नसली पाहिजे.

 • बातमी लेखनामध्ये स्थळ आणि काळ या दोन गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे 

बातमी लेखन करत असताना तुम्हाला ज्या बातमीचे स्वरूप तुम्ही लिहीत आहात त्या बातमीमध्ये स्थळ आणि काळ या दोन्ही गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे.

कारण जर तुम्ही कोणत्याही बातमीमध्ये काळाचा उल्लेख केला नाही तर ती बातमी कोणत्या वेळी घडली आहे हे कळणार नाही त्यामुळे तुम्हाला स्थळ आणि काळ याचा उल्लेख करणे आवश्यक असते.

 • बातमी लेखन नेहमी भूतकाळात लिहावे

बातमी लेखन करताना बातमी ही नेहमी भूतकाळ स्वरूपामध्ये असावी यामुळे बातमी लेखन हे भूतकाळ स्वरूप मध्ये करणे गरजेचे असते कारण कोणतीही बातमी कधीही ती भविष्यात घडलेली असणे शक्य नसते.

वर्तमान काळातील बातमी जेव्हा आपण लिहितो ती भूतकाळ स्वरूपातच होते यामुळे नेहमी तुम्हाला भूतकाळ स्वरूपामध्ये बातमी लेखन करायचे आहे.

 • भाषेची उत्तम ज्ञान तुम्हाला असले पाहिजे

बातमी लेखन करताना तुम्हाला  भाषेमध्ये तुम्ही बातमी लिहतात त्या भाषेचे उत्तम ज्ञान असले पाहिजे भाषेचे सर्व व्याकरण तुम्हाला आली पाहिजे आणि याच बरोबर तुमच्यामध्ये लेखन कौशल्य असणे खूप गरजेचे असते.

 • बातमी लेखन मध्ये वाक्य छोटी आणि परिच्छेद लहान ठेवावे

बातमी लेखन यामध्ये तुम्हाला नेहमी अक्षरे सुटसुटीत लिहावी आणि वाक्य छोटी लिहिण्याचा प्रयत्न करावा कारण बातमी वाचणाऱ्याला त्या बातमी मध्ये काय महत्त्वाचे आहे हे वाचायला सोपे जाते.

 • बातमी लेखन मध्ये स्वतःचे मत मांडू नये

बातमी लेखनामध्ये कधीही आपल्या स्वतःचे मत मांडू नये कारण बातमी लेखन यामध्ये जर तुम्ही स्वतःचे मत मांडले तर ती बातमीला एक वेगळे स्वरूप येऊन जाते त्यामुळे तुम्हाला कधीच बातमी लेखनामध्ये स्वतःचे स्वरूप नाही मांडायचे.

बातमी लेखन मराठी उदाहरणे- batmi lekhan in marathi examples

मुंबई किनारपट्टीला वादळाचा तडाखा कोळीवाडा उध्वस्त

आमच्या वार्ताहर द्वारे

मुंबई : 6 नोव्हेंबर

अरबी समुद्र मधून तयार झालेल्या निसर्ग वादळामुळे मुंबई किनारपट्टीच्या कोळीवाडा भागाला या वादळाचा खूप मोठा तडाखा बसला आहे यामध्ये स्थानिक लोकांचे आणि घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्ग वादळे मुंबईच्या दिशेने आल्यानंतर या वादळाची तीव्रता खूप जास्त झाल्यामुळे जेव्हा ते मुंबई किनारपट्टीला आली तेव्हा किनारपट्टीलगत असणारा कोळीवाडा वादळाच्या तडाख्यात मध्ये सापडला.

यामध्ये आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दहा लोक जखमी झालेले आहेत मृत व्यक्तींना सरकारने मदत करण्याचे आवाहन केले आहे आणि या ठिकाणी तात्काळ एनडीआरएफ ची टीम रवाना केली गेली आहे पुढील पाच दिवसांपर्यंत किनारपट्टी जवळ मासेमारी करण्यास बंदी घातलेली आहे.

ज्ञान भारती विद्यालय मध्ये मराठी दिन साजरा

पुणे : 27 फेब्रुवारी (वृत्तसंस्था पुणे) 

पुणे येथील ज्ञानभारती विद्यालयांमध्ये 27 फेब्रुवारीला मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये पुस्तकांचे प्रकाशन आणि मराठी भाषेला दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न कसे करावे हे मार्गदर्शन केले

ज्ञानभारती विद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून जी पुस्तके वर्षभर छापली जातात ती सर्व पुस्तके मराठी भाषा गौरव दिन प्रकाशीत करण्यात येतात आणि ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे.

यामध्ये पंधरा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आणि ही सर्व पुस्तके संस्कृती इतिहास आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तम पुस्तके आहेत आणि याच बरोबर मराठी भाषेचा दर्जा आणखीन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे भाषण मुख्याध्यापकांकडून देण्यात आले

अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या दहावीच्या परीक्षा मध्ये बातमी लेखन करायचे आहे आणि ही बातमी लेखन तुम्हाला विविध प्रश्नांच्या द्वारे विचारले जाते त्यापैकी खाली मी तुम्हाला काही प्रश्न दिलेली आहेत

batmi lekhan in marathi 10th class examples for practic

 • तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा Batami lekhan on republic day in marathi
 • आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची बातमी तयार करा batami lekhan on krida mahotsav in marathi
 • बाल दिन बातमी तयार करा  Batami lekhan bal divas in marathi
 • वसुंधरा दिन बातमी तयार करा Batami lekhan vasundhara din in marathi
 • वृक्षारोपण दिन बातमी तयार करा tree planting Batami lekhan in marathi
 • पुस्तक समारंभ बातमी तयार करा book festival batami lekhan in marathi
 • बाल दिवस बातमी तयार करा children day batami lekhan in marathi
 • स्वातंत्र्य दिन बातमी तयार करा independence day batami lekhan in marathi
 • विज्ञान प्रदर्शन बातमी तयार करा scince exibition batami lekhan in marathi

या सर्व विषयांत संबंधित तुम्हाला परीक्षे मध्ये प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला जे मी वरती बातमीचे स्वरूप दिलेले आहे त्या स्वरूपात अनुसरून तुम्हाला एक बातमी तयार करायची आहे

निष्कर्ष ; या लेखामध्ये मी तुम्हाला batmi Lekhan in marathi कसे करायचे हे सोप्या पद्धतीने सांगितले आणि batmi lekhan in marathi 10th class साठी सर्व गरजेचे प्रश्न देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत बातमी लेखनाचे सर्व नमुने देखील तुम्हाला मी वरती दिलेल्या आहेत मी जर तुम्हाला अशाच प्रकारचे उपायोजित लेखनाविषयी आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर पोस्ट बघु शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *